कोरोना रोखण्यासाठी भाविकांचे संकटमोचकाला साकडे – ठाण्यात पहाटेच पार पडला हनुमान जन्मोत्सव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची पिडा ईश्वरालाही सोसावी लागत असुन सण-उत्सवांवर सरकारने निर्बंध लादुन मंदिरेही टाळेबंद ठेवली आहेत.असे असले तरी,कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा यासाठी मंगळवारी हनुमान जयंतीदिनी भाविकांनी संकटमोचकाला साकडे घातले.
ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्यावतीने कोपरीतील हनुमान मंदिरात पहाटेच्या सुमारास कोविड नियमांचे पालन करीत पुरोहीत महेश देवधर यांच्याकरवी यथासांग पुजा-अर्चा करून साधेपणाने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाविकांनीही सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर,दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव वाढु लागल्याने राज्य शासनाने साथ प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.सर्व धार्मिक- सामाजिक उत्सवांवर निर्बंध घालुन दैनंदिन पूजाअर्चा वगळता मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.या पार्श्वभूमीवर केवळ परंपरेचे जतन व्हावे यासाठी भल्या पहाटेच ठाणे पूर्वेतील पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने पार पडला.यावेळी,मंदिर व्यवस्थापनाने मंदिर सजावटीसह परिसरात साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी करून सामाजिक बांधिलकी जपली.तर, भाविकांनीही कोविड नियमावलीचे पालन करीत कोरोनाच्या भयानक साथीचे संकट लवकर टळु दे,असे साकडे संकटमोचक हनुमानाच्या चरणी घातले.पहाटे पुजाअर्चा पार पाडल्यानंतर दिवसभर मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

 

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading