सार्वजनिक गणेश मुर्तीची दर्शन व्यवस्था ऑनलाईन माध्यमातून करण्याचे गणेशोत्सव मंडळांना निर्देश

कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य शासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून सर्व गणेश मंडळांनी केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारेच दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सर्व मंडळांना देण्यात आले आहेत. दरम्यान सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव काळात कोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी याबाबत राज्य शासनाच्यावतीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरात त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मूर्तींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सद्यस्थितीत कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत भाविकांच्या दर्शन रांगामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना श्रींचे दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्य शासनाच्यावतीने वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading