सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्विटरवर ॲट सायबर दोस्त नावाचं हँडल

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयानं ट्विटरवर ॲट सायबर दोस्त या नावाचं हँडल सुरू केलं आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसंच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचं आवाहन सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण वाघ यांनी केलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये याविषयी माहिती नसल्यामुळं अशाप्रकारचे गुन्हे होत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं पावलं उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्येही जागृती होणं आवश्यक आहे. आपल्या बँकेचा युजर आयडी, एटीएम, डेबीट कार्डचा क्रमांक, पीन, पासवर्ड, ओटीपी कोणालाही देऊ नये असं आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading