साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २३ सप्टेंबर पर्यंत या शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. सैनिक सातारा डॉट ओआरजी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरता येतील. ऑनलाईनद्वारे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिंटेड प्रत आणि डिमांड ड्राफ्ट सैनिक शाळा साता-याच्या शाळेत पोहचवण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर आहे. इयत्ता सहावी प्रवेशासाठी उमेदवार १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१० आणि नववी प्रवेशासाठी १ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २००७ जन्मलेला आणि मान्यताप्राप्त शाळेत शिकत असावा. सहावीसाठी ६० तर नववीसाठी ७ जागा उपलब्ध आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading