सातव्या दिवशी शहरातील १५१८ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन

ठाणे महापालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाट, गणेशमुर्ती स्वीकार केंद्र आणि कृत्रीम तलावांमध्ये सातव्या दिवशी एकूण १५१८ गणेशमुर्तीचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. तर सातव्या दिवशी ३६६८ नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. यावर्षीही शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या सात दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. यावर्षी सातव्या दिवशी १४,२६ घरगुती गणेशमुर्ती, ६७ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच २५ स्विकृत असे एकूण १५१८ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मासुंदा आणि आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी ५८ घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात ४९ घरगुती गणेश मुर्तीं, आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये ११ गणेशमुर्तीं, रेवाळे कृत्रिम तलाव येथे ६१ घरगुती गणेश मुर्ती, मुल्लाबाग येथे ५१ घरगुती गणेश मुर्ती, खिडकाळी तलाव येथे १२ घरगुती गणेश मुर्ती आणि ९ सार्वजनिक गणेश मुर्ती, शंकर मंदीर तलाव येथे २२ घरगुती गणेश मुर्ती आणि ४ सार्वजनिक गणेश मुर्ती, उपवन तलाव येथे २०८ घरगुती गणेश मुर्ती आणि १५ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे ५९ घरगुती गणेश मुर्ती, १० सार्वजनिक गणेश मुर्ती आणि २५ स्वीकृत गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे ४४ घरगुती गणेश मूर्ती, २ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच गायमुख घाट २ येथे ४ घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे ३१ घरगुती गणेश मुर्ती आणि ९ सार्वजनिक तर रायलादेवी घाट १ येथे २६६ घरगुती गणेश मुर्ती, रायलादेवी घाट २ येथे १४४ घरगुती गणेश मुर्ती, कोलशेत घाट १ आणि २ येथे ११८ घरगुती गणेश मुर्ती, १३ सार्वजनिक गणेश मुर्ती, आत्माराम बालाजी घाट येथे ३ घरगुती गणेश मूर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे २६४ घरगुती गणेश मुर्ती आणि ५ सार्वजिनक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत सातव्या दिवशी ५७५ नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्ष विसर्जन केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading