सातनंतर उघड्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई

संध्याकाळी सातनंतर उघड्या राहणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज सायंकाळी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई केली. सायंकाळी सातनंतर अनेक आस्थापना सुरू असल्याच्या तक्रारी तसेच काही ठिकाणी अन्न पदार्थांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सर्व आयुक्तांनी आज आपापल्या प्रभागामध्ये फिरून सातनंतर उघडी असलेली दुकाने सील करण्याची धडक कारवाई केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading