साखरपुड्याचा मेकअप नवरीला पडला महागात

साखरपुड्यात सुंदर दिसण्यासाठी मेकअप आर्टिस्ट ला बोलावणे एका नवरीला चांगलेच महागात पडले आहे. ओळखीची मेकअप आर्टिस्ट म्हणून तिला साखरपुड्याच्या मेकअप साठी नवरीने बोलवले मात्र साखरपुड्याच्या हॉलमध्ये नवरीची तयारी करत असताना नवरी ने काढून ठेवलेले कानातले , चैन आणि पाच हजार रुपये कॅश असा 70 हजाराचा मुद्देमाल घेऊन या दोन मेकअप आर्टिस्ट फरार झाल्या . मात्र वेळीच नवरीच्या नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली . डोंबिवली रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि तीन हजार रुपये कॅश असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . कल्पना राठोड ४३ आणि अंकिता परब उर्फ अंकिता इंगळे 29 वर्ष अशी या महिलांची नावे असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading