सरस्वती सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

सरस्वती सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. बेस्ट फाईव्ह मध्ये या शाळेतून प्रियांका लिमये ही प्रथम आली असून तिने ९९.६० इतके भरघोस गुण मिळवले आहेत. तर वेदांत वडशिंगकरला ९७.६०, भेंडवडे शाहिद ९७.४०, शुभम आपटे आणि मुक्ता बोरोले यांना ९७ टक्के तर रूतिका राऊत हिला ९६.८० टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्ज्वल यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading