सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विशाखा देशपांडे यांना चीनमधील परिषदेसाठी आमंत्रण

चीनमधील मकाऊ येथे ८ एप्रिलला होणा-या लहान मुलांविषयीच्या एका परिषदेसाठी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विशाखा देशपांडे यांना आमंत्रण आलं असून लवकरच त्या चीनला जाणार आहेत. या परिषदेमध्ये त्या इम्पॉर्टन्स ऑफ फ्री प्ले सेशन्स इन प्री स्कूल्स या विषयावर सादरीकरण करणार आहेत. याशिवाय ॲडव्होकेटींग प्ले, थ्रू प्ले या सत्राच्या मॉडरेटर म्हणूनही काम पाहणार आहेत. ही जागतिक परिषद अमेरिकेच्या वर्ल्ड फोरम फौंडेशनतर्फे भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातील ८० ते १०० देशातील ८०० प्रतिनिधी सहभागी होत असतात. जगभरातील लहान बालकं आणि बाल शिक्षणात असलेली आव्हानं तसंच उपलब्ध संधी यावर चर्चा आणि उहापोह होणार आहे. विशाखा देशपांडे यांना या परिषदेसाठी दहाव्यांदा आमंत्रित केलं आहे. यापूर्वी झालेल्या परिषदांमध्ये त्यांनी बालशिक्षण संदर्भातील विविध विषयांवर सादरीकरण केलं आहे. २००५ मध्ये मॉन्ट्रीयल येथे झालेल्या परिषदेमध्ये त्यांना राजदूत हा मानाचा दर्जा बहाल करण्यात आला होता. २००७ पासून जागतिक स्तरावरील बालशिक्षण अभ्यासक्रम समितीमध्ये काम करता करता त्या आता अभ्यासक्रम समितीच्या प्रमुख आहेत. या परिषदेसाठी विशाखा देशपांडे यांना आलेलं आमंत्रण ही मानाची गोष्ट आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading