सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत मारली बाजी

सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत बाजी मारली आहे. 47 वी राज्य ज्युदो स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यातून ३५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या वजनी गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सरस्वती क्रीडा संकुलातील हितेन बुटोला आणि अपूर्वा पाटील यांनी cadet खुल्या वजनी गटात सिल्वर मेडल मिळवले. त्यातील अपूर्वा पाटील हिची 13 ते 16 सप्टेंबर रोजी इम्फाळ मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. दोघेही खेळाडू सरस्वती क्रीडा संकुल, ठाणे येथे त्यांचे प्रशिक्षक देवीसिंग राजपुत आणि भुपेंद्रसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading