श्रावण महिन्यातील उपवास, व्रतवैकल्यं निज श्रावण मासातच करावीत – दा कृ सोमण

अधिक श्रावण आणि निज श्रावण दोन्हीही पवित्र असून श्रावण महिन्यात येणारी व्रतवैकल्यं मात्र निज श्रावण मासातच करावीत अशी माहिती दा कृ सोमण यांनी दिली आहे. यावर्षी श्रावण महिना अधिक महिना आल्याने उपवास, व्रतं, सण उत्सव केव्हा साजरे करायचे याविषयी नागरिकांमध्ये असलेली साशंकता सोमण यांनी दूर केली आहे. त्यामुळे आता श्रावण महिन्यातील उपवास हे निज श्रावण मासातच करावेत हे स्पष्ट झालं आहे. श्रावणी सोमवार यावर्षी ९ आहेत हा संदेश चुकीचा असल्याचंही सोमण यांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारपासून अधिक श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. अधिकमासाला पुरूषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्या मास असेही म्हणतात. या महिन्यात दानधर्माला महत्व आहे. भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्व असल्याने अधिक महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, जलदान, श्रमदान, विद्यादान, धनदान करावे असं त्यांनी सांगितलं. तर श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी हे सर्व निज श्रावण महिन्यात करावे असंही सोमण यांनी स्पष्ट केलं. परंतु पावित्र्य राखण्यासाठी या दोन्ही महिन्यात शाकाहारी रहावं असंही सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading