शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा – रवींद्र चव्हाण

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून आमचे सरकार प्रयत्न करीत असून शेतकरी सन्मान योजनेची ठाणे जिल्ह्यात उत्तम अंमलबजावणी करण्यात येईल असे बंदरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. ते डोंबिवलीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ११ फेब्रुवारीपर्यंत डोंबिवलीच्या सावळाराम महाराज म्हात्रे स्टेडीयम येथे हा महोत्सव सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांना गट स्थापन करण्यासाठी शासन मदत करीत असते, या माध्यमातून त्यांना त्यांचा विकास करता येणे शक्य आहे असे सांगून रवींद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संबंधित योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे सांगितले. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रयोग सुरु असून शेतकऱ्यांनी या संशोधनाचा फायदा करून घ्यावा. वांगणीमध्ये फुलणाऱ्या गुलाबाची विदेशात निर्यात होते त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी फुशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करावी असे आवाहनही त्यांनी केले. बदलापूर परिसरात मोगऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते परंतु शेतकरी बाजारपेठेत वेळेवर पोहचू शकत नाही असेही ते म्हणाले.मंजुषा जाधव याप्रसंगी म्हणाले की डोंबिवलीतील या कृषी महोत्सवाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. वाडा परिसरातील पिकविल्या जाणाऱ्या भाताला आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्व असल्याने डॉक्टर्ससुद्धा याची दखल घेतात असे सांगून त्या म्हणाल्या की, शहापूर भागात होणाऱ्या भेंडीची निर्यात परदेशात होते ही जिल्ह्याच्या दृष्टीने समधानाची गोष्ट आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading