शेगांवच्या गजानन महाराजांचा १४२वा प्रगटदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४२वा प्रगटदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध भागात या प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील राम मारूती रस्त्यावरील गजानन महाराज मंदिर, शिवाई नगर येथील गजानन महाराज मंदिर, ब्राह्मण सेवा संघ तसंच डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध ठिकाणच्या गजानन महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र गजानन महाराजांच्या मंदिराबाहेर दिसत होतं. यामध्ये विशेष करून महिला वर्गाची संख्या जास्त होती. दर्शनासाठी होणा-या गर्दीचं नियंत्रण करण्याकरिता काही ठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रगट दिनाच्या निमित्तानं गजानन महाराजांना आवडणा-या खिचडी, भाकरी, पिठलं, अंबाडीची भाजी, दाण्याची चटणी अशा प्रसादाचं वाटप ठिकठिकाणी केलं जात होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading