शिवसेवा मित्रमंडळ आयोजित व्यंगचित्रकला स्पर्धेत व्यंगचित्रकार मल्हार पिसाट, रविंद्र राणे आणि संदीप शिंदे विजेते

शिवसेवा मित्रमंडळ आयोजित बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धेत व्यंगचित्रकार मल्हार पिसाट, रविंद्र राणे आणि संदीप शिंदे विजेते ठरले. या स्पर्धेसाठी एकूण २४३ प्रवेशिका आल्या होत्या. यामध्ये बालव्यंगचित्रकार १९८, तरूण-हौशी ३४ तर ज्येष्ठ हौशी ११ व्यंगचित्रकार होते. गेली ८ वर्ष व्यंगचित्रकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. स्वरूप सकपाळ या दिव्यांग मुलाला चित्रकलेतील उत्कृष्ट प्राविण्याबद्दल विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बाल व्यंगचित्रकार गटात मल्हार पिसाटला प्रथम, दिया सावंतला द्वितीय, सागरिका पवारला तृतीय, तरूण हौशी व्यंगचित्रकार गटात रविंद्र राणेंना प्रथम, डॉ. अभिजित त्रैलोक्यना द्वितीय तर आनंद अंकुश यांना तृतीय क्रमांक, ज्येष्ठ हौशी व्यंगचित्रकार गटात संदीप शिंदेना प्रथम, विष्णू बाताडे यांना द्वितीय तर नरेश वाणी यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. व्यंगचित्राच्या प्रभावी माध्यमातून शिवसेना प्रमुखांनी शिवसेना एक सामाजिक चळवळ यशस्वी करून दाखवली. त्यामुळं व्यंगचित्रकलेचा हा ठेवा जपणं आणि जोपासणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन विजू माने यांनी केलं. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading