शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन

शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेची भिती जावून त्यांचा आत्मविश्वास आणि पालकांची चिंता दूर व्हावी यासाठी संपूर्ण बोर्डाच्या पध्दतीने सराव परीक्षेचे आयोजन आनंद दिघे यांनी सुरु केले होते.शिवसेना नेत्यांनी हा उपक्रम सलग गेली 30 व्या वर्षी देखील असाच निरतरपणे चालू आहे. ठाण्यामध्ये कळवा, मुंब्रा, कोपरी ठाणे (पूर्व),किसननगर, पडवळनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर, काजुवाडी, मानपाडा, दिवा,ज्ञानेश्वरनगर, मिरा-भाईंदर, जव्हार, वाडा आणि ठाणे शहरात चार अशा 30 परीक्षा केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. तरी या परीक्षेला बसू इच्छित विद्यार्थ्यांनी वरील केंद्राजवळील शिवसेना शाखांमध्ये संपर्क साधावा. या परीक्षा मराठी माध्यम, सेमी इंग्रजी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीही घेण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी – शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा, प्रवेश अर्ज दररोज सायंकाळी 6.00 ते रात्री 8.00 वा. या वेळेत स्वीकारण्यात येतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2020 अशी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading