शिवसेनेच्या महारक्तदान सप्ताहात तीन दिवसांत ५७८७ बाटल्या रक्त संकलन

नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून रविवारी तिसऱ्या दिवशीही रक्तदात्यांचा ओघ कायम होता. रविवारच्या दिवसभरात १८५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. महारक्तदान सप्ताहाच्या पहिल्या तीन दिवसांतच एकूण ५ हजार ७८७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. केवळ ठाणेच नव्हे तर डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मीरा रोड, भाईंदर येथील रक्तदात्यांनीही रविवारी ठाण्यात येऊन रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर श्री. शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सुमारे ६५ ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी २३३७ बाटल्या, शनिवारी १६०० बाटल्या, तर रविवारी १८५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading