शासकीय शिवजयंती साजरी – मात्र शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळे फारसा उत्साह नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शासकीय जयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरुन वाद आहे. त्यामुळे शिवप्रेमी तिथीनं शिवजयंती साजरी करतात. तर शासनाच्या नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी रोजी झाला असल्यामुळे शासकीय पातळीवर 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी होत असल्यामुळे आणि यात शिवसेना तसेच शिवप्रेमी मंडळींचा सहभाग नसल्यानं शिवजयंतीत तितकासा उत्साह दिसत नाही. दरवर्षी प्रमाणे यंदाही मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. मराठा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची एक दिंडी काढण्यात आली होती. आज दिवसभर भगवे झेंडे लावून दुचाकीधारक छत्रपती शिवरायांचा गजर करताना दिसत होते. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading