शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर आणि औषध फवारणी

शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरु आहे. पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या १ आणि निश्चित निदान केलेली १ रुग्णसंख्या आहे. तसेच मलेरियाचे २२ रुग्ण आढळुन आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत असून एकुण ४२ हजार ११७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ८२ घरे दुषित आढळुन आली. तसेच एकुण ५९ हजार २५१ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी १ हजार ३६७ कंटेनर दूषित आढळुन आले. यापैकी ४०२ दुषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर ८२६ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ७ ई-रिक्षा, ८ बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात १,६२७ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे १५,५७२ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading