शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत हॉटेलच्या बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. मौजे नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील पिंक बाबा या हॉटेलचे शेडचे बांधकाम, पाच लाकड़ी मचान आणि बांबू ताडपत्री शेडच बांधकाम निष्कासित करण्यात आले. ओवळा ब्लुरुफ येथील वेलवेट गार्डन या हॉटेलच्या शेडचे बांधकाम तसेच नाका हॉटेलच्या शेडचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अनुराधा बाबर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिकच्या अधिकृत ठेकेदाराचे २० मजुर, १ जेसीबी मशीन, २ डंपर इत्यादीच्या साहाय्याने करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading