शहरातील अनधिकृत ८ वाणिज्य गाळे जमीनदोस्त

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून बेथनी हॉस्पिटल जवळ सुरु असलेल्या अनधिकृत ८ आरसीसी वाणिज्य गाळे जेबीसीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली. या कारवाईतंर्गत वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बेथनी हॉस्पिटल जवळ सुरु असलेल्या अनधिकृत तळ अधिक १ मजली आरसीसी ८ वाणिज्य गाळे जेबीसीच्या साहाय्याने निष्कासीत करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading