शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईतंर्गत ब्रम्हांड सिग्नल येथे फुटपाथवर बांधलेल्या अंदाजे १० X १५ चौ. फुटाचे विटा सिमेंटचे अनधिकृत शौचालयाचे बांधकाम, नागलाबंदर येथील १५ X १५ चौ. फुटाचे विटा सिमेंटचे अनधिकृत १ रुमचे बांधकाम, पानखंडा येथील १० X १५ चौ. फुट अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
तसेच हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथील अनधिकृत गाळयांचे पत्र्याचे शेड निष्कासीत करण्यात आले. कोलशेत रोड येथील राजू पाटील यांचे निवासी आणि अनिवासी ५० X २० चौ . फुटाचे पक्के बांधकाम निष्कासीत करण्यात आले. ढोकाळी येथील राम यादव यांचे चौथ्या मजल्यावरील आरसीसीचे ८०० चौ. फुटाचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. त्याचप्रमाणे मरीआई नगर येथील लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने बांधलेले २० X ३० चौ.फुट व १० x २० चौ. फुटाचे २ भंगारचे अनधिकृत गोडाऊन निष्कासीत करण्यात आले. विहंग हॉटेल शेजारील सर्व्हिस रोड येथील साई प्लाझा सोसायटीचे अनधिकृत आरसीसी गेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आले. तर मोहन मिल कंपाऊंड येथील २ पडीक पक्की बैठी आणि १ अतिधोकादायक बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading