शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून आज दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जेबीसीच्या साहाय्याने आज जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील समीर हुंडेकर यांचे तळ मजल्याचे दोस्तीच्या मागे असलेले संपूर्ण अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले. तसेच शिबालीनगर येथील हिलाल पब्लिक स्कूल मधील तळअधिक पहिल्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम, शिबलीनगरमधील प्लिंथ आणि त्यावरील कॉलम जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading