शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद

शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे NH -4 च्या कामातंर्गत गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे 22 केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत. तसेच टेमघर जलशुध्दी केंद्रामध्ये रॉ वॉटर पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दिकरण केंद्रामधील सॅन्ड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे. तसेच स्टेम प्राधिकरणाच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल दुरूस्तीची कामे करण्याकरिता बुधवारी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, गांधीनगर, सिध्दांचल, आकृती, सिध्देश्वर, जॉन्स्न, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, डिफेन्स, येऊर, विठ्ठल क्रिडा मंडळ, सुरकुरपाडा तसेच कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे असं पालिकेकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading