शहराचा पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी सकाळी ९ वाजल्या पासून पुढील २४ तास राहणार बंद

शहराचा पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी सकाळी ९ वाजल्या पासून पुढील २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरणा मार्फत मुख्य जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शुक्रवार २० डिसेंबर, रोजी सकाळी 9.00 ते शनिवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा आणि स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे. शुक्रवार २० डिसेंबर, रोजी मुख्य जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading