वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी केलं प्लाझ्मा डोनेशन

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी प्लाझ्मा डोनेशन केले असून नायर रुग्णालयात ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेशनद्वारे पॉझिटिव्ह रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हे प्लाझ्मा डोनेशन केलं असून भविष्यातही अशाच पद्धतीने प्लाझ्मा डोनेशन करून कोरोना रुग्णांना आधार देणार असल्याचे जाधव यांनी म्हटलं आहे. ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून समाजकार्यात स्वत:ला झोकून देणार्‍या जाधव कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. त्यानंतर प्लाझ्मा डोनेशनविषयी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून नायर रुग्णालयात प्लाझ्मा डोनेशनचा निर्णय घेतला. याठिकाणी डॉ. रमेश वाघमारे यांच्या टीमने प्लाझ्मा डोनेशन त्यांनी केले. त्यातून कोरोना रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी नम्रता भोसले-जाधव यांनी आपला प्लाझ्मा दान करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या डोनेशन दिलेल्या प्लाझ्माचा फायदा होतो. बरे झालेल्या रूग्णाच्या विविध चाचण्यांनंतर हे प्लाझ्मा डोनेशन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात असून ते अत्यंत सुरक्षित आहे. यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने कोरोनावर मात करणे सोपे जाईल. यापुढे देखील प्लाझ्मा डोनेशन करीता जनजागृती करण्याचा निश्चय केल्याचं नम्रता भोसले-जाधव यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading