विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असतानाच, बच्चे कंपनीला स्वत:च्या हाताने गणपती घडविण्याची संधी देण्यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. `ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आमचा गणपती बाप्पा सुपरस्टार,’असा गणरायाचा गजर करीत मुले गणराय साकारण्यात रंगून गेली. लहान मुलांची प्रतिभा आणि कल्पनाशक्तीला संधी देण्यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यंदाही शिवाईनगर येथील सिद्धिविनायक सभागृहात सहा वर्षांवरील मुलांसाठी गणपती घडविण्यासाठी विशेष शिबीर भरविण्यात आले होते. मूर्तिकार दत्तात्रेय चिव्हणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. गणपती घडविण्यासाठी मुलांमध्ये औत्स्यूक्य होते. चिव्हणे यांनी मुलांना सोप्या भाषेतून मुलांना समजावून सांगत मुलांच्या मनाचा वेध घेतला. मातीचे गोळे तयार करण्यापासूनच गणेशमूर्ती तयार करण्यापर्यंत बारकावे सांगितले. मुले मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती. त्यानंतर मूर्ती बनविण्यास सुरूवात झाली. काही मुलांनी प्रथमच मूर्ती घडविण्याचा श्रीगणेशा केला. मुलांनी गणरायाच्या पायापासून सुरू केलेला मूर्ती घडविण्याचा प्रवास हा मुकुटापर्यंत संपला. अनेक मुलांनी अप्रतिम गणेशमूर्ती साकारल्या. माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी मुलांचे कौतुक केले. या शिबिरा निमित्ताने मुलांना हिंदू संस्कृतीतील सण आणिउत्सव साजरे करण्याच्या पद्धती आणि परंपरेविषयीही माहिती देण्यात आली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading