विद्युत नियामक आयोगानं नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा

राज्यातील वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देताना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं घराच्या छतावर सौर उर्जा निर्मिती करणा-या ग्राहकांसाठी नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करून नेट मिटरिंगला विरोध दर्शवला होता आणि नेट बिलिंगची मागणी केली होती. पण आयोगानं महावितरणची नेट बिलिंगची मागणी धुडकावून लावली. ठाणे लघुउद्योजक संघटनेनं आयोगाकडे मागणी करताना प्रस्तावित बदलास विरोध दर्शवला होता. यामुळं कोणीही ग्राहक सौर उर्जा निर्मिती करणार नाही आणि सौर उर्जा वीज निर्मितीचं लक्ष्यही साध्य होणार नाही असं ठाणे लघुउद्योजक संघटनेनं म्हटलं होतं. मात्र पूर्वी नेट मिटरिंग सौर्ज उर्जा मापनाचे मीटर महावितरण देत होतं. पण आता यासाठी ग्राहकाला खर्च करावा लागणार आहे. सौर उर्जा निर्मितीसाठी आलेल्या अर्जावर १५ दिवसात निपटारा करावा, नेट मिटरिंग आणि सौर उर्जा संबंधी प्रक्रिया मंजूर झाल्यानंतर १० दिवसात पूर्ण करून ग्रीडशी जोडावी तसंच कराराची प्रक्रियाही १० दिवसात करावी अशा सूचना आयोगानं दिल्या असल्याचं ठाणे लघु उद्योजक संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख शिशीर जोग यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading