विज्ञान दिनाच्या दिवशी ठाणेकरांनी ग्रह, ता-यांचे दर्शन अनुभवले. विज्ञान दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने ग्रह तारे आकाश दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आकाश दर्शना सोबत बांदोडकर विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक नामदेव मांडगे यांचा खगोलशास्त्रीय सुसंवाद ठाणेकरांना अनुभवायला मिळाला. नागरिक आणि लहान मुलांची खगोलीय प्रश्नांची कोडी या निमित्ताने उलगडली. दुपारी सूर्य दर्शन, संध्याकाळी खगोलशास्त्रीय सुसंवाद आणि रात्री ग्रह तारे दर्शन अशा प्रकारे कार्यक्रमाचे स्वरूप होते.