वागळे इस्टेट भागात वीजेचा धक्का बसून एका वानराचा मृत्यू

वागळे इस्टेट भागात पुन्हा एकदा वीजेचा धक्का बसून एका वानराचा मृत्यू झाला आहे.काल सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. यापूर्वीही वीजेचा धक्का बसून किसननगर भागात दोन वानरांचा मृत्यू झाला होता. वागळे इस्टेटमधील एका जिवंत विद्युतवाहिनीच्या संपर्कात आल्यामुळं या वानराचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. हे वानर वीजेच्या खांबावर चढलं होतं आणि तिथूनच त्याला विद्युत वाहिनीचा धक्का बसला असावा असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading