वागळे इस्टेट परिसरात कचराकुंडीजवळ मास्क, पीपीई कीट सारख्या वस्तू टाकल्याचा प्रकार

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच कचराकुंडीच्या बाहेर मास्क, हँडग्लोव्हज् आणि पीपीई कीट सारख्या वस्तू टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र बेजबाबदार घटना समोर येत आहेत. वागळे इस्टेट परिसरात अशाप्रकारे रस्त्यावर साहित्य टाकण्यात आल्यामुळं काहीशी घबराट निर्माण झाली आहे. वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २२ जवळ असलेल्या नाना-नानी पार्कजवळील कचराकुंडीच्या बाजूला असा कचरा अस्ताव्यस्तपणे टाकण्यात आला आहे. हा कचरा कोणी टाकला याचा शोध सध्या घेतला जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading