वसंत डावखरे स्मृती भजन स्पर्धेत ओम नादब्रह्म तर महिला गटात अंतर्नाद भजनी मंडळ प्रथम

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेत पुरूष गटात अलिबागच्या ओम नादब्रह्म भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात ठाण्याच्या अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील विविध मंडळांनी उत्कृष्ट भजनं सादर केली. या स्पर्धेत पुरूष गटात लिंगेश्वर प्रासादिक मंडळानं द्वितीय तर नादब्रह्म भजनी मंडळानं तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात आईभवानी महिला मंडळानं द्वितीय तर अनुपम भक्ती मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून सौरभ देशमुख, पखवाजसाठी प्रथमेश वाघ, तबल्यासाठी अनिकेत गिरी, झांजांसाठी सचिन मोरे तर हार्मोनियमसाठी संतोष शिरकर यांना पुरस्कार देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading