लॉकडाऊनमध्ये सकारात्मकता बाळगून महिलांनी केलं वटपूजन

वटपौर्णिमेला वडाची होणारी तोड रोखण्यासाठी महिलांनी वडाच्या झाडाच्या फोटोचे पूजन करावे असे आवाहन नगरसेविका परीषा सरनाईक यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन महिलांनी घरातच वडाच्या झाडाचे पूजन करून अनोखा संदेश देत वटपौर्णिमा साजरी केली. लॉकडाऊनमध्ये सकारात्मकता बाळगत वडाच्या झाडाच्या फोटोची पूजा करून महिलांनी परंपरा जपली असल्याचं परिषा सरनाईक यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य होते. ही बाब लक्षात घेऊन विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना घरोघरी वडाच्या झाडांचे फोटो देऊन महिलांनी घरातच वडाच्या झाडाचे पूजन करून हा सण साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. सरनाईक यांच्या आवाहनाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. तसेच घरातच मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून वृक्षांची तोड करु नका, वृक्ष संवर्धन करा, असा संदेश देत जागतिक पर्यावरणदिनही साजरा केला. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांना नटून सजून हा सण साजरा करावा याकरिता परीषा सरनाईक यांनी “नथीचा नखरा” या शीर्षकांतर्गत वटसावित्रींसाठी आगळीवेगळी स्पर्धाही आयोजित केली आहे. यामध्ये पैठणी, नथ यासह विविध आभुषणे घालून नटणाऱ्या वटसावित्रींनी वडाच्या झाडाच्या फोटोसह आपला फोटो पाठवण्याचे आवाहन केले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्या वटसावित्रींना प्रथम पारितोषिक नथ, द्वितीय पारितोषिक पैठणी आणि तिसरे पारितोषिक पैंजण देण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading