लेकसिटी मॉलला आग – दोघेजण गुदमरले

ठाण्यातील कापुरबावडी परिसरात असलेल्या लेकसिटी मॉलला आग लागली होती.या आगीचा त्रास दोनजणांना झाल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लेकसिटी मॉलला दुपारी पावणेदोनच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचं वृत्त समजताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेतली. या आगीमुळं परिसरात प्रचंड धूर निर्माण झाला असून या धुराचा त्रास दोघांना झाला. लेकसिटी मॉलच्या चौथ्या माळ्यावर अडकलेल्या नामदेव झोरे यांची अग्निशमन दलानं सुटका केली तर अग्निशमन दलाचे रविंद्र शेलार यांनाही आगीचा त्रास झाला. झोरे यांना क्युरे हॉस्पिटलमध्ये तर शेलार यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या दोघांनाही आगीच्या धुराचा त्रास झाला. आग नियंत्रणात आली असली तरी प्रचंड धूर निर्माण झाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading