लसीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी रोज नवीन रंगीबिरंगी कूपन्स

जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणातील गोंधळ टाळण्यासाठी एक नवीन कल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी ही कल्पना मांडली आहे. त्यांच्या या नवीन कल्पनेनुसार रंगीबिरंगी रोज नवीन कूपन्स वापरली जाणार आहेत. त्यामुळे लसीकरणा दरम्यान होणारे आरोप आणि गदारोळ टाळू शकता येईल. डॉक्टर कैलाश पवार यांनी विविध रंगाची कुपन तयार केली असून कुपन साठी रोज वेगळा रंग वापरला जाणार आहे. त्याचबरोबर या कूपन्सस्वर डॉक्टरांची सही आणि शिक्का ही असा असणार आहे, रोज लसीकरणासाठी नवीन रंगाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही बनावट कूपन्स वापरु शकणार नाही असे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयात आजपासून या पद्धतीचा अवलंब सुरू करण्यात आला आहे. ही कल्पना यशस्वी ठरल्यास त्याचा वापर इतर ठिकाणीही होण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading