लक्ष विचलित करून सव्वा दोन लाखांची लूट

लक्ष विचलित करून २ लाखाहून अधिक रक्कम लंपास करण्याचा प्रकार भिवंडीमध्ये घडला आहे. भिवंडीतील निलेश कोंडलेकर यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. ते आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना दोन व्यक्तींनी हटकले. एकानं त्यांना आपले पैसे पडले आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी निलेश कोंडलेकर हे आपली दुचाकी रस्त्यावरच थांबवून खाली उतरले आणि पाठीमागे रस्त्यावर पाहिले असता त्यांना १०० आणि १० रूपयांच्या प्रत्येकी ३ नोटा पडलेल्या दिसल्या. त्यामुळं त्यांनी तिथे जाऊन या नोटा उचलल्या आणि पुन्हा आपल्या दुचाकीकडे आले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला लावलेली प्लास्टीकची कॅरीबॅग गायब झाली होती. कोंडलेकर यांनी २ हजाराच्या ६ तर ५०० च्या ४१८ नोटा ठेवल्या होत्या. चोरट्यांनी त्यांचं लक्ष विचलित करून त्यांचे २ लाख २१ हजार रूपये लंपास केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading