रेल्वे पोलीसांच्या सतर्कतेमुळं हरवलेल्या एका १२ वर्षाच्या मुलाला पुन्हा मिळू शकले त्याचे पालक

रेल्वे पोलीसांच्या सतर्कतेमुळं हरवलेल्या एका १२ वर्षाच्या मुलाला पुन्हा त्याचे पालक मिळू शकले. काल ४ च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर एक १२ वर्षीय मुलगा रडत असताना आढळला. हे पाहून धीरज जाधव या सुरक्षा दलाच्या कर्मचा-यानं त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपलं नाव आणि वागळे इस्टेट मधील काकाचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगितला. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सैजाद शेख या मुलाची माहिती दिली. त्याच्या काकाने त्याला ओळखल्यावर त्याला रेल्वे पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आणि कागदपत्रांची खातरजमा करून सैजाद शेखला त्याच्या काकाच्या ताब्यात देण्यात आलं. यावर मोहम्मद इस्माईल शेख याने रेल्वे पोलीसांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading