रेल्वेमध्ये विसरून गेलेल्या ९ लाख रूपयांच्या मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा रेल्वे पोलीसांमुळे पुन्हा मिळाल्या

रेल्वेमध्ये गर्दीमुळे विसरून गेलेल्या सुमारे ९ लाख रूपयांच्या मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा रेल्वे पोलीसांमुळे पुन्हा त्यांच्या मालकास मिळू शकल्या आहेत. विशाल तरानी हे परदेशस्थ भारतीय आणि त्यांचा एक मित्र कमल हे दोघं सोनं, ४ लॅपटॉप आणि परकीय चलन असलेल्या दोन मौल्यवान बॅग्ज गर्दीमुळे गाडीत विसरून गेले होते. मूळचे उल्हासनगरचे असलेले हे रहिवासी दुबईहून येत होते. घाटकोपरहून कल्याणला प्रवास करताना गाडीत गर्दी असल्यामुळे आपल्या बॅग रेल्वेत विसरून गेले होते. या बॅगमध्ये ४ लाख ६८ हजाराच्या ११७ ग्रॅम वजनाच्या ३ बांगड्या, २ लाख रूपयांचं ५० ग्रॅमचं पेंडण्ट, १ लाख ६० हजारांचे ४ लॅपटॉप, दुबईतील रहिवासी कार्ड, दुबईला परत जायचं तिकिट तसंच ५० हजार रूपयांचं परकीय चलन या बॅगमध्ये होतं. रेल्वे पोलीसांमुळे ही बॅग पुन्हा प्रवाशांना मिळू शकली. याबद्दल त्यांनी रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading