रूग्णवाहिका चालकांना रूग्ण हाताळण्याचं प्रशिक्षण

रूग्ण कसे हाताळायचे या विषयाचं प्रशिक्षण प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा रूग्णालयातर्फे रूग्णवाहिका चालकांना देण्यात आलं. रूग्णवाहिका चालकांना रूग्ण हाताळण्याचं प्रशिक्षण देण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असावा. एखाद्या दुर्घटनेनंतर रूग्णाला रूग्णवाहिकेच्या चालकानं रूग्णालयात कसे घेऊन जायचे याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं. एखादी दुर्घटना झाल्यास त्वरीत प्रथमोपचार कसे द्यायचे, रूग्णांना कसे हाताळायचे, त्यांना रूग्णवाहिकेत टाकून रूग्णालयापर्यंत कसे पोहचवायचे याविषयीचे प्रशिक्षण नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून देण्यात आले. या प्रशिक्षणात जिल्हा रूग्णालयासह ठाण्यातील विविध रूग्णालयांच्या रूग्णवाहिकांचे चालक सहभागी झाले होते. जखमी रूग्णाला उचलताना रूग्णाची ८० टक्के हानी होते. त्याचा फटका रूग्णाला बसतो. मात्र या प्रशिक्षणामुळे आता रूग्णांना रूग्णालयात व्यवस्थित पोहचवलं जाईल. अशा प्रशिक्षणाची गरज असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading