राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समिती आणि आयुर्वेद व्‍यासपीठाच्या वतीने आयुष काढ्याचे वाटप

राष्ट्रीय स्‍वयंसेवक संघ जनकल्‍याण समिती आणि आयुर्वेद व्‍यासपीठाच्या वतीने प्रतिकारशक्ती वृध्दींगत व्हावी यासाठी आयुष काढ्याचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना उपाययोजनेत कार्यरत असणारे कार्यकर्ते, पोलिस यंत्रणा, पालिका आरोग्‍य कर्मचारी तसेच हॉटस्‍पॉट भागातील रहिवाशांना आयुष काढ्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. कोरोना विरोधातील लढाईत सर्वशक्‍तीनिशी उतरलेल्‍या राष्ट्रीय स्‍वयंसेवक जनकल्‍याण समितीचे विविध उपक्रम सुरू असून कोरोना विरोधातील उपाययोजनेत आता आयुष काढ्याची साथ ठाणेकरांना मिळणार आहे. या काढ्यामुळे नागरिकांच्‍या प्रतिकारशक्‍तीत वाढ होतेच त्‍याचबरोबर हा काढा घेतल्‍याने संशयित रूग्‍णात देखील झपाटयाने सुधारणा होत असल्‍याचे निष्‍कर्ष समोर आले आहेत. हा काढा आता भरड आणि गोळी स्‍वरूपात देखील उपलब्‍ध झाला आहे. आयुष मंत्रालयाच्या कोरोना आपत्ती प्रतिबंधन समितीचे सदस्य आणि आयुर्वेद व्यासपीठाचे प्रवर्तक वैद्य विनय वेलणकर यांच्‍या संकल्‍पनेतुन या गोळ्या आणि काढा भरड तयार करण्‍यात आली आहे. एका व्‍यक्‍तीने वीस दिवस हा काढा घ्‍यायचा आहे. ज्‍यांना हा काढा हवा असेल त्‍यांनी अशोक सोनटक्‍के यांना ९९६९१३७६४८ आणि श्रीराम पाठक यांना ९८९२७९८५१९ या क्रमांकावर केवळ व्‍हाट्सअॅप मेसेज पाठवावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading