राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाकरिता १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासास अनुमती

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण १२ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्यास लोकलच्या प्रवासासाठी अनुमती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठविले आहे. या सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्हयात काही निवडक शासकीय, खाजगी अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, विज्ञान, परीसर अभ्यास, समाजशास्त्र या विषयात दोन तासांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं विद्यार्थी -शिक्षकांना चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई, मुंबई उपनगर आणि जिल्ह्यातील शाळेत येण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना (१८ वर्षाखालील ) लोकलचा प्रवास करावा लागणार आहे त्यांना१२ नोव्हेंबर रोजी लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून विद्यार्थ्यांसोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading