रायपूर येथे झालेल्या ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंची बाजी

रायपूर येथे झालेल्या 33 व्या पश्चिम विभागीय ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी बाजी मारली आहे. ठाण्यातील अली शेख आणि निखील ढाके यांनी सुवर्ण तर मिहिका सुर्वे हिने रौप्य पदक पटकावले आहे. 33 वी पश्चिम विभागीय ज्युनियर ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा स्वामी विवेकानंद स्टेडियम, रायपूर येथे झाली. या स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात 400 मीटर अडथळा शर्यतीत अली शेख याने रौप्यपदक तसेच मेडले रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले.तर याच स्पर्धेत निखिल ढाके यांनेही सुवर्णपदक जिंकले. 14 वर्षांखालील ट्रायथलॉनमध्ये कानन देसाई हिने सुवर्ण तर, मिहिका सुर्वे हिने रौप्यपदक मिळवले. निखिल ढाके याने 400 मीटरमध्ये कांस्यपदकही मिळवले आहे. हे सर्व खेळाडू दादोजी कोंडदेव स्टेडियमध्ये प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading