राज्य वेटलिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या वेटलिफ्टर्सची पदकांची लयलूट

बुलढाण्यातील मलकापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत अश्वमेध वेटलिफ्टींग फाउंडेशनच्या ठाण्यातील खेळाडूंनी 8 पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. बुलढाणा येथील राज्यस्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत अश्वमेध वेटलिफ्टींग फाउंडेशनच्या ठाण्यातील खेळाडूंनी 2 सुवर्ण, 2 रजत आणि 4 कांस्य पदकांची कमाई केली. वेदिका टोळे-रजत पदक यूथ, माही बाभूळकर-कांस्य पदक यूथ, केतकी पाटील- सुवर्ण पदक ज्यूनियर, ग्रिष्मा थोरात- सुवर्ण पदक यूथ आणि कांस्य पदक ज्यूनियर, प्रांजली पगारे-कांस्य पदक यूथ, प्रणव आंब्रे-रजत पदक यूथ आणि शुभम गावडे-कांस्य पदक सिनिअर पदक पटकावले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading