राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ११६ कर्मचा-यांची कोरोनावर यशस्वी मात

राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील एकूण ११६ कर्मचा-यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने कोरोनाच्या काळात तातडीच्या सेवेत असणा-या लोकांना कामाच्या ठिकाणी पोहचवणे, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडणे अशी मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे महामंडळाच्या कर्मचा-यांना विशेषत: चालक-वाहकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे काही दिवस खोपट एसटी डेपो बंदही ठेवण्यात आला होता. ठाणे विभागातील १३५ कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील ११६ जणांनी कोरोनावर मात केली असून १७ जणं अजूनही उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading