राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषदेसाठी जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड

बालवैज्ञानिक परिषदेसाठी राज्यस्तरावर जिल्ह्यातून १४ प्रकल्पांची निवड झाली आहे. या परिषदेचे समायोजक सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली. राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषद जुन्नर येथे होत आहे. सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे ४, श्रीरंग इंग्रजी विद्यालयाचे ३, डॉ. बेडेकर विद्यामंदिरचे ३, भगवती शाळा, ए. के. जोशी आणि ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ यांचा प्रत्येकी १ प्रकल्प राज्यस्तरीय बालवैज्ञानिक परिषदेसाठी निवडले गेले आहेत. सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलला फोल्डेबल हेल्मेट, मॉस्किटो रिपेलन्टस्, मिल्क पॅकेटस्, हेअरडाय, श्रीरंग विद्यालयाचे ऑरगॅनिक फार्मिंग इन बॅकयार्ड, बायो टेक्नीक्स ऑफ वॉटर प्युरिफिकेशन, हार्वेस्टींग ॲण्ड रिसायकलिंग ऑफ एसी ड्रीप वॉटर, डॉ. बेडेकर विद्यामंदिरचे अंडरग्राऊंड वॉटरमधील हेवी मटेरियल्सचा अभ्यास, व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी ॲण्ड क्युअर, इनडोअर पोल्यूशन, ए. के. जोशीचा मल्टी न्यूटियन्ट सप्लायर, के.ई. एस भगवतीचा ॲनालिसीस ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड स्ट्रेस अमंग स्टूडंटस्, लोकपुरम पब्लिक स्कूलचा ॲक्वाफाईटस्, महापालिका शाळा क्रमांक २३ चा इफेक्ट ऑन मिड-डे मिल ऑन स्टुडंट एज्युकेशन हे प्रकल्प राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडले गेले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading