येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन

येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा विधी प्राधिकरण आणि टीएमसी व्हीपीएम लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. आपल्याला सरकारने खूप साऱ्या योजना सोई सुविधा उपचार पद्धती आणि कायदेशीर सुरक्षा हक्क दिले आहेत पण त्याचा योग्य तो लाभ, त्याबद्दल माहिती आणि ह्या सगळ्या सोयी सुविधा योजनांचा उपभोग घेताना आपल्याला कोणी अडवल किंवा नियमांचे उल्लंघन केले तर काय करायचं ह्या बद्दल माहिती देण्यासाठी टि. एम. सी. व्ही. पी. एम. लॉ कॉलेजच्या विद्यार्थीनी तन्वी वैद्य, अपेक्षा बेलवले आणि अमिता ठोसर यांनी आयोजित केलं होतं. येऊरमधील सात पाड्यांमधील आदिवासी समाज, पारंपारिक रहिवासी यांना वैकल्पिक वाद निवारण पद्धती, विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती, वरीष्ठ नागरिकांचे अधिकार, बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिकार, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना, अमली पदार्थ व्यसन नियंत्रण, मानसिक आरोग्य कायदा, वनहक्क कायदा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले व त्या बद्दलची माहिती पत्रके देण्यात आली, ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ञ डॉ. सुवर्णा माने यांनी तणाव व्यवस्थापनेची माहिती दिली. आपल्या प्रत्येक अधिकार आणि हक्कासाठी कायदा आहे आणि नियमांचे उल्लंघनासाठी कायद्यात उपाय आणि योग्य ती शिक्षा दिली आहे. त्या बद्दल माहिती देण्यासाठी, मदत करण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरण आणि टि. एम. सी. व्ही. पी. एम. विधी महाविद्यालय कायदेशीर मदत कक्ष नेहमी सहकार्यासाठी तत्पर असतो.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading