येऊरमधील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात यश

येऊर येथील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. येऊरमधील एका उपहारगृहाच्या जवळ या बिबळ्याचा वावर पाहून गावक-यांनी याबाबतची तक्रार वन विभागाकडे केली होती. वन विभागानं मंगळवारी या बिबळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण बिबळ्याचा ठावठिकाणा न लागल्यानं पुन्हा काल या बिबळ्याला शोधण्याची मोहिम सुरू केली. वन विभागानं या बिबळ्याला पकडण्यासाठी २ पथकं तयार केली. बिबळ्या ज्या ठिकाणी आहे ती जागा अडथळे लावून मोकळी करण्यात आली. त्यावेळी बिबळ्या एका झाडामागे असल्याचं लक्षात आलं. मात्र हा बिबळ्या अशक्त दिसत होता आणि त्याला धड चालताही येत नव्हतं. तो झुडुपाच्या मागे असताना त्याला गुंगीचं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी या बिबळ्याने डरकाळी फोडली आणि वन विभागाच्या एका कर्मचा-यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या बिबळ्याच्या पंजामुळे वन विभागाच्या कर्मचा-याला किरकोळ जखमा झाल्या. त्यानंतर पुन्हा वन विभागानं या बिबळ्याला गुंगीचं इंजेक्शन दिलं. यामुळं बिबळ्या बेशुध्द झाल्यावर त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी करण्यात आली. सध्या या बिबळ्यावर औषधोपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading