मो. ह विद्यालयाकडून न्यायमूर्ती अभय ओक यांचं अभिनंदन

न्यायमूर्ती अभय ओक यांचा सर्वोच्च न्यायालयाचे सन्मानित न्यायाधीश म्हणून आज दिल्ली येथे शपथविधी झाला. मो. ह. विद्यालयाचे ते १९७५ च्या बॅचचे ते विद्यार्थी होते. त्याबद्दल मो. ह. विद्यालयाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात सुमारे २० वर्षे यशस्वीपणे वकिली केली. मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ काळ न्यायमूर्तीपद तर काही काळ कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते. कमालीचा वक्तशीरपणा या त्यांच्या गुणाचे सर्वत्र कौतुक आहेच त्या शिवाय इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व,एका वाचनात लक्षात ठेवण्याची आकलनशक्ती,ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती ,तसेच वेगाने वाचन करण्याचे कौशल्य या अंगभूत गुणांचा विकास करत स्वतःचे कायद्याचे ज्ञान कायम अद्ययावत ठेवले. हायकोर्टात त्यांची प्रतिमा अतिशय अभ्यासू,मेहनती,
नावाप्रमाणेच निर्भीड,प्रामाणिक पणे, निःपक्षपाती आणि वेगवान, अथक परिश्रम करणारे न्यायमूर्ती म्हणून ख्याती होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading