मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे 29 मे पर्यंत रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. मुंबई मेट्रो लाईन-4 चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम चालू आहे. या कामाच्या दरम्यान मेट्रो -4 च्या पिलर क्र. 61 ते 64 विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, घोडबंदर रोड पिलर क्र 24 ते 26 वेदांत 61 हॉस्पिटल घोडबंदर रोड ठाणे आणि पिलर 44 ते 45 ओवळा सिग्नल या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित होण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबई-ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
मुंबई-ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंब्रा-कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गेइच्छित स्थळी जातील. नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक 24 ते 26 व पिलर क्र. 44 ते 45 वर गर्डर टाकण्याच्या वेळी वेदांत हॉस्पिटल कट जवळ डावे वळण घेवून विहंग हिल्स सोसायटी कट जवळ उजवे वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील. तसेच पिलर क्रमांक 61 ते 64 वर गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल्स सोसायटी कट जवळ डावे वळण घेवून सर्व्ह‍िस रोडने नागलाबंदर सिग्नल मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading