मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात नमाज पठण आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचं कोकण विभागीय महसुल आयुक्तांचं आवाहन

मुस्लिम बांधवांनी येणा-या रमजान महिन्यात पठण नमाज आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच करावेत असं आवाहन कोकण विभागीय महसुल आयुक्तांनी केलं आहे. 24 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण आणि इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत असे आवाहन महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी केले आहे. राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह आणि इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोकण विभागातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात येत आहे. कोकण विभागात नवी मुंबई, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिल्हयात कोरोनाचा प्रभाव अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय महसुल आयुक्तांनी हे आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading