मुलुंड मध्ये जल्लोषात नववर्ष शोभायात्रेचं आयोजन

मुलुंड मध्ये जल्लोषात नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग होता. मुंबईत आज ठिकठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात निघाल्या. मुलुंड मध्ये मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. नववर्ष स्वागत समिती मुलुंड च्या वतीने या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. या शोभा यात्रेत शेकडो च्या संख्येंने मुलुंडकर सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा करुन महिलानी स्कूटी रॅली काढली होती. लहान मुले तरुण तरुणी विविध वेशभूषेत या यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे, तीनशे पेक्षा जास्त मुली महिला तरुणी आणि जेष्ठ महिला यांनी एकत्रित लेझीम आणि नृत्याचे सादरीकरण केले. विविध मराठी गाण्यांवर शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुंदर असे हे सादरीकरण करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading